how to link aadhar to bank नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना, पीएम किसान, नमो शेतकरी, अशा सर्व योजनांचे पैसे हे डीबीटी मार्फत जमा होतात मग त्यासाठी गरजेचे असते ते तुमचे बँक खाते हे आधार कार्ड ला लिंक असणे मग हे आधार व बँक खाते घरबसल्या दोन मिनिटात आधार लिंक करता येऊ शकते मग आधार व बँक खाते कसे लिंक करायचे ते आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
खातेदार धारकांना आधार कार्ड ऑनलाइन किंवा ऑफलाईन अशा दोन प्रकारे लिंक करता येतील मग खातेदारकांना ऑनलाइन नोंदणी करताना फक्त त्यांची नोंदणी ही इंटरनेट बँकिंग साठी मोबाईल बँकिंग ॲप्स साठी बँकेसोबत असणे आवश्यक आहे. मग तर मित्रांनो पुढील प्रमाणे सहा प्रकारे आपण आधार कार्ड हे बँक खात्यासोबत लिंक करू शकतो.
आधार कार्ड हे बँक खात्यासोबत लिंक करू शकतो बँकेत अर्ज करणे, एटीएम मशीनद्वारे, एसएमएस द्वारे, फोन कॉल द्वारे, इंटरनेट बँकिंग द्वारे, मोबाईल ॲप द्वारे, इत्यादी सहा प्रकारे आपण हे लिंक करू शकतो.
तर मित्रांनो पहिली पद्धत आहे बँकेत अर्ज करणे मित्रांनो बँकेत जाऊन तुम्हाला आधार लिंक चा फॉर्म भरावा लागेल त्यामध्ये बँक खात्याचा तपशील बारा अंकी आधार कार्ड नंबर आधार कार्ड ची सेल्फ असिस्टंट म्हणजे झेरॉक्स त्यासोबत जोडावी लागेल.
तर दोन-तीन दिवसात तुम्हाला तुमचा लिंक मोबाईलवर या ठिकाणी एसएमएस द्वारे यादी माहिती येईल कन्फर्म झाल्याचा तुम्हाला कळेल मग तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत जोडले जाईल.