Ladki bahan Yojana Patra yadi नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची पात्र झालेल्या महिलांची यादी पोर्टलवर जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला आपल्या गावाची पात्र महिलांची यादी मोबाईलवर कशी पहायची आणि डाऊनलोड कशी करायची हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे कारण आपल्या गावाची पात्र महिलांची यादी मोबाईलवर कशी पहायची आणि डाऊनलोड कशी करायची हे या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
तर पहा मित्रांनो आपल्या गावाची लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांची यादी आपले मोबाईल मध्ये पाहण्यासाठी आणि मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये गुगल ओपन करायचा आहे. आणि गुगल ओपन झाल्यावर या ठिकाणी मित्रांनो आपल्या जिल्ह्याचे नाव आणि त्याच्यापुढे कॉर्पोरेशन हे नाव टाकायचं आहे जसे बीड जिल्ह्याची यादी लागली आहे म्हणून या ठिकाणी बीड कॉर्पोरेशन हे नाव टाईप करून सर्च करतो तर त्याप्रमाणे तुम्ही पण तुमच्या जिल्ह्याचे नाव सर्च करायचं आहे.
त्याच्यानंतर अशाप्रकारे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी आपल्या वार्डनुसार ओपन होईल आता मित्रांनो आपल्या वार्डाची यादी पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी समोर बघा डाउनलोड हे नाव आहे तरी याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे अशा प्रकारे संपूर्ण यादी आपले मोबाईल मध्ये डाऊनलोड पण होईल आणि पाहायला पण मिळेल तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या गावाची लाडकी बहीण योजनेची पात्र यादी मोबाईल मध्ये पाहू शकता. मित्रांनो आताच याद्या जाहीर होणे सुरू झाला आहे.