Pik Vima new update शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा झाला जमा

Pik Vima new update नमस्कार शेतकरी बांधवांनो ऍग्रो न्यूज वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या 2023 खरीप हंगामा मधील 75% नुकसान भरपाई वाटप सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांना एसेमेस देखील प्राप्त होत आहेत दहा ऑगस्ट पर्यंत 75% अग्रीमची नुकसान भरपाई जमा करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले होते त्याच अनुषंगाने पीक विमा कंपन्यांनी 75 टक्के आगरी माथेर जमा करायला सुरुवात केली आहे.

20 जुलै 2024 च्या झालेल्या राज्य सरकारच्या बैठकीत 75 टक्के अग्रीम वाटपाचे आदेश दिले होते त्यामुळे जवळजवळ सध्या मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील जवळपास 14 जिल्ह्यांना याचा लाभ मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.

यात नंदुरबार, धुळे, बुलढाणा, वाशिम, अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर, यवतमाळ, कोल्हापूर, परभणी, धाराशिव, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना लाभ मिळत आहे.

मित्रांनो येणाऱ्या दहा ऑगस्टपर्यंत 75 टक्के अग्रीम पडणार असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये अशी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.

Leave a Comment